Breaking News

अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ; मुंबई केंद्रासाठीच्या प्राथमिक फेरीला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची मुंबई केंद्रासाठीची प्राथमिक फेरी नुकतीच सीकेटी महाविद्यालयात झाली. या ठिकाणी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत स्पर्धकांचा उत्साह वाढविला.
यंदाच्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत प्राथमिक फेरीसाठी महाराष्ट्रातून एकूण 108 संस्थांनी नोंदणी केली होती.
जळगाव, नागपूर, पुणे, रायगड केंद्रांनंतर मुंबई केंद्रासाठीची प्राथमिक फेरी 6 ते 9 जानेवारीदरम्यान कोरोनाच्या नियमांचे पालन करून सीकेटी महाविद्यालयात रंगली. यात 40पेक्षा एकांकिकांनी सहभाग घेतला होता. या वेळी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उपाध्यक्ष तथा महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाह श्यामनाथ पुंडे, स्पर्धा प्रमुख गणेश जगताप, खजिनदार अमोल खेर, कार्यसमिती सदस्य अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, संजीव कुलकर्णी यांनी नियोजन पाहिले, तर परीक्षक म्हणून प्रमोद शेलार व अभिजित झुंझारराव यांनी कामगिरी बजावली.
आता सर्व ठिकाणच्या प्राथमिक फेर्‍यांतून 24 एकांकिकांची महाअंतिम स्पर्धेसाठी निवड केली जाईल. महाअंतिम फेरी पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 28, 29, 30 जानेवारी रोजी होणार आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply