Breaking News

पनवेल परिसरात कोल्ह्याचा मुक्तसंचार; आठ ते 10 जण जखमी

पनवेल ः वार्ताहर
पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात कोल्ह्याचा मुक्तसंचार होत असून त्याने आठ ते 10 जणांना जखमी केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातारण पसरले आहे.
मोसारा, मानघर, कुंडेवहाळ परिसरातील गावांमध्ये कोल्ह्याचा मुक्त वावर आहे. या कोल्ह्याने जखमी केलेल्यांमध्ये लहान मुलीचाही समावेश आहे. जखमींनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली आहे.
काही जागरूक ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वन विभाग व पोलीस ठाण्याला दिली. दरम्यान, नागरिकांनी बाहेर फिरताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply