नगरसेवक अभिमन्यू पाटील यांचा पाठपुराव्याला यश
खारघर : रामप्रहर वृत्त
खारघरमधील मुर्बी गावात स्मशानभूमी सुशोभीकरणाचे काम व प्रतिक्षादालन कामांसाठी नगरसेवक अभिमन्यू धर्मा पाटील यांनी पनवेल महापालिकेकडे पाठपुरावाकरून निधी मंजूर करून घेतला. त्या अनुषंगाने या कामांचे भूमीपूजन नुकतेच गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
माजी प्रभाग समिती सभापती व विद्यमान नगरसेवक अभिमन्यू पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली खारघर परिक्षेत्रांतर्गत मुर्बी गावातील स्मशानभूमी सुशोभीकरणाचे काम व प्रतिक्षादालन कामांसाठी पनवेल महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार महापालिकेचा निधी मंजूर झाल्याने काम सुरू झाले. त्यामुळे नगरसेवक अभिमन्यू पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आभार मानले.
भूमीपूजन समारंभाला नगरसेवक अभिमन्यू पाटील यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक भगवान पाटील, श्रीकांत पाटील, काशीनाथ घरत, युवा नेते नितेश पाटील, मंगेश पाटील, मयूर घरत, अतुल पाटील, कुणाल पाटील, शशीकांत पाटील, रघुनाथ पाटील, सोमनाथ पाटील, सूरज गायकवाड आदी उपस्थित होते.