Breaking News

गव्हाण विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनियर कॉलेजमध्ये स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य तसेच रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक प्रमोद कोळी व जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे यांचे हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

या वेळी विद्यालयाच्या उपशिक्षिका हर्षला पाटील यांनी  राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग सांगून त्याच्या जीवनकार्याचा वेधक आढावा घेतला.

या वेळी ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे, विद्यालयाचे उपप्राचार्य जगन्नाथ जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, ज्येष्ठ अध्यापक सुनील गावंड, एकनाथ ठाकूर, शिक्षक पालक संघाचे सचिव देवेंद्र म्हात्रे, प्रसन्न ठाकूर, प्रा. राजू खेडकर, प्रा. उमेश पाटील, प्रा. राजेंद्र चौधरी, सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्योत्स्ना ठाकूर, प्रयोगशाळा प्रभारी चारूशीला ठाकूर, ज्युनिअर कॉलेज परीक्षा विभाग प्रमुख प्रा. जयवंती ठाकूर, प्रा. अर्चना पाटील, क्रीडा विभागप्रमुख जयराम ठाकूर, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख द्रौपदी वर्तक, गुरूकुल प्रमुख संदीप भोईर, उपशिक्षिका संपदा म्हात्रे, अस्मिता पाटील, प्रणाली पाटील, उपशिक्षक सागर रंधवे, ग्रंथपाल महेश म्हात्रे, जनार्दन खैरे, अरूण कोळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपशिक्षिका हर्षला पाटील यांनी केले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply