Breaking News

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

नवी दिल्ली ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 12) राज्यसभेत मुद्रा योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍यांवर निशाणा साधला. मुद्रा योजनेंतर्गत 27 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची कर्जे देण्यात आली. ही कर्जे कोणी घेतली जावयाने का, असे म्हणत सीतारामन यांनी हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात आला. या वेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधत जावई हा शब्द काँग्रेसचा ट्रेडमार्क नाही. जावई प्रत्येक घरात असतो, परंतु काँग्रेससाठी जावई (दामाद) हे एक विशेषनाम आहे, असे म्हणत टोला लगावला. राज्यसभेतील चर्चेदरम्यान निर्मला सीतारामन यांनी डिजिटल ट्रान्झॅक्शनवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नालाही उत्तर दिले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply