उरण : बातमीदार
ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचालित, रामचंद्र म्हात्रे विद्यालय अॅण्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्स आवरे येथे बुधवारी (दि. 12) राष्ट्रीय युवा दिन संस्थेचे विश्वस्त प्राचार्य राजेंद्र म्हात्रे यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मेघा म्हात्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे, ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मेघा म्हात्रे, बांधकाम व्यावसायिक जमाल सिद्धिकी, नाट्य व सिनेकलावंत सुयश म्हात्रे, तसेच कॉलेजचे प्राचार्य सुभाष ठाकूर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद केणी यांनी केले.