पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात 45 वर्षांवरील नागरिकांना विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिकांसाठी पालिकेने दोन नवीन लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. यामध्ये टाटा हॉस्पिटल, खारघर येथे पहिले एक शासकीय लसीकरण केंद्र होते. त्यात वाढ करत आणखी एक लसीकरण केंद्र याठिकाणी सुरू करण्यात आले आहे, तसेच खांदा कॉलनी येथील रोटरी क्लब याठिकाणी नव्याने शासकीय आरोग्य उपकेंद्र लसीकरणासाठी सुरू करण्यात आले आहे.
45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना कोविशिल्ड लसींचा दुसरा डोस सध्या पालिका क्षेत्रातील आठ शासकिय लसीकरण केंद्रावर सुरू करण्यात आला असून 6 मेपासून पुढील आदेश होईपर्यंत हे लसीकरण सुरू असणार आहे. सकाळी प्रत्येक केंद्रावर 200 टोकन देण्यात येत आहे. दुसरा डोस घेण्यास येणार्या नागरिकांनी पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र अथवा पहिला डोस घेतल्यानंतर प्राप्त झालेला एसएमएस सोबत राखणे बंधनकारक असणार आहे.
पनवेलमध्ये एकुण आठ शासकिय केंद्रावर 45 वर्षांवरील अधिक वयाच्या नागरिकांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यात आहे. जोपर्यंत लसींचा साठा उपलब्ध आहे तोपर्यंत हे लसीकरण चालू राहील. भविष्यात जसा लसींचा साठा उपलब्ध होईल त्या प्रमाणात लसीकरण केंद्र संख्येमध्ये वाढ किंवा घट करणे याबाबत कार्यवाही केली जाईल. याशिवाय 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोविन अॅपवर नोंदणी झालेल्या व लसीकरणाची दिनांक आणि वेळ निश्चित केलेल्या नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्याचे कामही चालूच आहे.
45 वर्षांवरील नागरिकांची लसीकरण केंद्रे (केवळ दुसरा डोस)
टाटा हॉस्पिटल, खारघर (येथे दोन आहेत)
रोटरी क्लब आरोग्य उपकेंद्र, खांदा कॉलनी
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 2, कोळीवाडा, पनवेल
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 4, कळंबोली,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 6, कामोठे,
ओएनजीसी हॉस्पिटल, पनवेल,
रेल्वे हॉस्पिटल, पनवेल रेल्वे स्टेशन
18 ते 44 नागरिकांची लसीकरण केंद्रे
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1- गावदेवी, पनवेल
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 3- नवीन पनवेल
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5- खारघर