Breaking News

पनवेलमध्ये ई-टॉयलेट्स सुविधा उपलब्ध

पनवेल : रामप्रहर वृत्त

नगरसेविका दर्शना भोईर यांच्या प्रयत्न व सततच्या पाठपुराव्याने पनवेल शहरातील रोहिदास वाडा येथे व ओरिओन मॉल च्या बाजूला ई-टॉयलेट्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ई-टॉयलेट्सचे उद्घाटन रविवारी (दि. 16) नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते करण्यात आले.

या परिसरात मच्छी मार्केट, भाजी मार्केट, एमएसईबी कार्यालय यासह मोठा व्यापारी वर्ग आहे, परंतु याठिकाणी अद्याप शौचालयाची सुविधा नव्हती. त्यामुळे अनेकजण उघड्यावरच शौचास व लघुशंकेला जात असत. याचा त्रास इथल्या स्थानिक रहिवाश्यांना होत होता, तर इथल्या नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नगरसेविका दर्शना भोईर यांनी पनवेल महापालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून रोहिदास वाडा व ओरियन मॉल येथे 4 ई टॉयलेट्स उपलब्ध करून देण्यात आले. त्याचे उद्घाटन रविवारी नगरसेवक राजू सोनी, भाजप प्रभाग 19चे अध्यक्ष पवन सोनी यांच्या हस्ते करण्यात आले.

दोन महिलांसाठी तर दोन पुरुषांसाठी टॉयलेटची सुविधा करण्यात आली असून याठिकाणी 24 तास वीज व पाण्याची सुविधाही करण्यात आली आहे. नगरसेविका दर्शना भोईर यांच्या प्रयत्नांनी रोहिदास वाडा येथील नागरी प्रश्न तत्काळ मार्गी लावल्याने नगरसेवक राजू सोनी व येथील स्थानिक नागरिक, रहिवाश्यांनी आभार मानले आहेत.

उद्घाटन सोहळ्यावेळी नगरसेविका दर्शना भोईर, भाजप पनवेल शहर सचिव सुनील खळदे, प्रभाग क्र.19 अध्यक्ष पवन सोनी, चंद्रकांत मंजुळे, यतीन देशमुख, दीपक नावडेकर, गजानन भागवत, शाम भगत, शंकर पाटील, अनंत खारुटकर, अंकुश पाटील, विष्णू भोपी, प्रवीण मोहोकर, मधुकर उरणकर, सचिन उरणकर, यशवंत जाधव, तानाजी झुगे, मंगेश पिळविलकर, राजू कोळी यांच्यासह आदी उपस्थित होते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply