Breaking News

ऑईलची चोरी करणारा गजाआड

पनवेल तालुका पोलिसांची कारवाई

पनवेल : वार्ताहर

उभ्या असलेल्या गाड्यांतून क्रुड ऑईलची चोरी करणार्‍या एका सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यात वापरलेल्या गाडीसह अटक केली आहे.

तालुक्यातील पोयंजे गावाच्या जवळील बालाजी पेट्रोल पंपाच्या मागे उभ्या करण्यात आलेल्या टँकरमधून एक अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळेस क्रुड ऑईल काढत असल्याची तक्रार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात फिर्यादीने केली. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सतिश जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास गोपाळ, पोलीस निरीक्षक सुनिल कारोडे आदींच्या पथकाने सापळा रचून संबंधित ठिकाणी टँकरमधून रात्रीच्या वेळेस क्रुड ऑईल काढणार्‍या सराईत गुन्हेगार विलास भारसावडे (वय-43, रा.-भटवाडी रिस) याला अटक केले. तसेच त्याच्या ताब्यात असलेल्या झेन मारूती गाडी (क्र.- एमएच 01 डीए 3709) यासह ताब्यात घेतले असून त्याच्याकडे गाडीसह चोरीचा मुद्देमाल असा मिळून जवळपास एक लाख पाच हजार760 रूपये किंमतीचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे. यापूर्वीही या आरोपीने अशाच प्रकरचे ऑईल चोरी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास गोपाळ करीत आहेत.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply