Breaking News

नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची पनवेल भाजपची मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी पनवेल भाजपच्या वतीने तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली युवा पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने पनवेल पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना या संदर्भात निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या शिष्टमंडळात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, विश्वजित पाटील, रोहित घरत, अंकुश पाटील यांचा समावेश होता.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 17 जानेवारी रोजी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बेताल वक्तव्य केले होते. पटोले यांनी मी ‘मोदींना मारू शकतो आणि मोदीला शिव्या देऊ शकतो’, असे बेताल वक्तव्य एका कार्यक्रमात केले होते. नरेंद्र मोदी हे संपूर्ण भारताचे नेतृत्व करणारे सक्षम पंतप्रधान व्यक्ती आहेत. पंतप्रधान हे भारताचे सर्वोच्च पद आहे आणि या पदाचा आपण अभिमान राखला पाहिजे. त्यांच्याबद्दल असे बेताल वक्तव्य करणे हे देशद्रोही कृत्य आहे, तसेच नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य अत्यंत निंदाजनक आहे. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल ग्रामीण मंडलतर्फे तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन पंतप्रधानांविषयी बेताल वक्तव्य करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply