Breaking News

आशिया चषक हॉकी स्पर्धा : भारताकडून मलेशियाचा धुव्वा

मस्कत ः वृत्तसंस्था

गतविजेत्या भारतीय संघाने महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेची दमदार सुरुवात करताना सलामीच्या लढतीत मलेशियाचा 9-0 असा धुव्वा उडवला. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील चौथे स्थान पटकावण्याच्या विक्रमी कामगिरीनंतर प्रथमच मैदानात उतरणार्‍या भारतीय महिला संघाने या सामन्यात आक्रमक शैलीत खेळ केला. त्यांनी पूर्वार्धात चार आणि उत्तरार्धात पाच गोलची नोंद केली. भारताकडून वंदना कटारिया (8 आणि 34वे मिनिट), नवनीत कौर (15 आणि 27वे मि.), शर्मिला (46 आणि 59वे मि.) यांनी प्रत्येकी दोन, तर दीप ग्रेस एक्का (10वे मि.), लालरेमसिआमी (38वे मि.) आणि मोनिका (40वे मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. गोलरक्षक सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला यंदाही जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. भारताचे चांगली कामगिरी कायम राखण्याचे लक्ष्य आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply