Breaking News

रायगडातील सहा विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

बालविज्ञान परिषदेसाठी तीन प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड

पाली : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील तीन प्रकल्पांची नुकतीच राष्ट्रीय स्तरावर बाल विज्ञान परिषदेत निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील बालविज्ञान परिषदेचे आयोजन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात गुजरात सायन्स सिटीमार्फत ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद या वैज्ञानिक उपक्रमाचे आयोजन केले जाते.

‘शाश्वत विकासासाठी विज्ञान’ हा या वर्षीच्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचा मुख्य विषय आहे. तालुका, जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावर या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे सहभागी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले.

हे तीन प्रकल्प यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक, सर्व तालुका समन्वयक, जिल्हा समन्वयक अनिल पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे राज्य समन्वयक विश्वास कोरडे, रायगड जिल्हा शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना पवार शिंदे, विज्ञान पर्यवेक्षिका सविता माळी, रीना पाटील आदींनी अभिनंदन केले आहे. ठाणे येथील जिज्ञासा ट्रस्ट यांनी राज्यस्तरीय बालविज्ञान परीषदेचे यशस्वी आयोजन केले. यासाठी जिज्ञासा ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे व त्यांच्या सहकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

जिल्ह्यातील तीन प्रकल्प

1) कोको पीट गार्डनिंग, विद्यार्थिनी : अक्षरा ठाकूर व आर्या म्हात्रे, शाळा : श्रीमती भागूबाई ठाकूर विद्यालय द्रोणागिरी, ता. उरण

2) परफेक्ट न्युट्रीशनल फूड फॉर प्रेगनंट वुमेन, विद्यार्थिनी : ध्रुवी मोकल व सायली महाडिक, शाळा : महात्मा गांधी विद्यालय चोरढे, ता. मुरूड

3) इंटीग्रेशन ऑफ व्हायटल मेझरमेंट डिव्हायसेस अ‍ॅन्ड बेसिक लाईफ सपोर्ट प्रोसिजर, विद्यार्थी : निकुंज चौबे व सिद्धार्थ तिवारी, शाळा : अपीजय स्कूल खारघर, ता. पनवेल

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply