Monday , June 5 2023
Breaking News

नागपुरातील अश्लील नृत्यप्रकरणी अखेर पोलिसांत गुन्हा दाखल

नागपूर ः प्रतिनिधी

नागपूर जिल्ह्यातील उमरेड आणि कुही तालुक्यांत काही गावांमध्ये ‘डान्स हंगामा’ नावाने जाहिराती करून बंद शामियान्यामध्ये अश्लील नृत्य सादर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या नागपूर ग्रामीण भागात शंकरपटांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये तरुणवर्ग उत्साहाने भाग घेतो, मात्र काही जण शामियान्यांकडे वळू लागतात. या शामियानात अश्लिलतेचा कळस गाठला जातो. याचे व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ उडाली आहे. उमरेड तालुक्यातील बामणी या गावात ‘डान्स हंगामा’ कार्यक्रमासाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. अश्लील नृत्य केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष असल्यामुळे ग्रामीण भागात अश्लील नृत्याचा प्रकार सुरू आहे. अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत. पोलिसांनी सतर्क राहून अवैध धंदे बंद करावेत.

-आमदार चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply