अलिबाग : बातमीदार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेचे अलिबाग येथे दहन करून भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड जिल्ह्यातर्फे त्यांचा निषेध करण्यात आला. अलिबाग येथील भाजप कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या व त्यांच्या प्रतिमेचे दहन केले. भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, अलिबाग शहर अध्यक्ष अॅड अंकीत बंगेरा, ओबीसी सेल अध्यक्ष तालुका अशोक वारगे, सतीश लेले, अॅड. पल्लवी तुळपुळे, अजित भाकरे, कामगार आघाडी जिल्हा संयोजक रवींद्र पाटील, युवा मोर्चाचे रोहित जाधव, तुषार भगत, अजिंक्य पाटील, निखिल चव्हाण, जगदिश घरत, समीर राणे, अॅड. मनस्वी महेश मोहिते, आतिश गायकवाड, प्रशांत पाटील, हर्षल तांडेल, आदित्य नाईक आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.