पनवेल : रामप्रहर वृत्त
दीपक फर्टिलायझर अॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत ईशान्या फाउंडेशन व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेलच्या संयुक्त विद्यमाने पाले खुर्द येथे नुकतेच नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यात आले असून एकूण 243 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 82 रुग्णांना दृष्टीची समस्या तर 93 रुग्णांना मोतीबिंदूची समस्या असल्याचे आढळून आले. दृष्टीची समस्या असलेल्या रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले आणि ज्या रुग्णांना मोतीबिंदूची समस्या आहे, त्यांच्या शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट येथे करण्यात आले. सर्व शस्त्रक्रिया दीपक फर्टिलायझर अॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमार्फत करण्यात येत आहेत.