Breaking News

जादूगार अवधूतने नेरळकरांना हसवले…. जयदीप मंडळाच्या कार्यक्रमात जादूचे प्रयोग

कर्जत : बातमीदार नेरळ येथील जयदीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने बुधवारी महाराष्ट्र राज्य स्थापना दिन साजरा केला. रात्री जादूगार अवधूत यांनी जादूचे प्रयोग सादर केले. त्यावेळी शेकडो बालगोपाळ आणि महिलांनी जादूचे प्रयोग पाहण्यासाठी गर्दी केली होती. नेरळ पूर्वेचा राजा समजल्या जाणार्‍या जयदीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बुधवारी महाराष्ट्र दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नेरळ पूर्व भागात ध्वजारोहण झाल्यानंतर सत्यनारायण महापूजा आणि भंडारा आयोजित केला होता. रात्री मनोरंजन करण्यासाठी रत्नागिरीहुन जादूगार अवधूत आले होते. त्यांनी जादूचे प्रयोग सादर करताना एका मुलीला स्टेजवर टांगून ठेवली होती, तर तीन वेगवेगळ्या रुमालात एक तिरंगा ध्वज तयार केला, बंद पुस्तकातून कबुतर उडवलं, रिकाम्या पिशवीतून कबुतर काढून दाखवले. त्याशिवाय रिकाम्या डब्यातून तीन लिटर पाणी काढले. असे अनेक प्रयोग जादूगार अवधूत यांनी करून दाखवले. या प्रयोग दरम्यान दादा गायकवाड यांनी मिमिक्री करून दाखवली.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply