Breaking News

पोलिसांना होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

पनवेल : वार्ताहर

बँक ऑफ बडोदा कामोठे शाखेच्या वतीने व एन. कनेक्ट डॉ. नितीन पोवळे यांच्या सहकार्याने कामोठे पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. आयुष मंत्रालय यांच्या शिफारशीनुसार आर्सेनिक अल्बम-30 या  होमिओपॅथिक गोळ्यांचा डोस रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे आर्सेनिक अल्बम-30 या गोळ्यांचे मोफत वाटप करण्याचा उपक्रम बँक ऑफ बडोदा कामोठे व एन. कनेक्ट डॉ. नितीन पोवळे यांच्या सहकार्याने राबविला जात असून त्यांनी कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबसाहेब तुपे यांच्याकडे या गोळ्यांचे किट सुपूर्द केले. या वेळी बँक ऑफ बडोदा कामोठे शाखेचे व्यवस्थापक संजय गोडसे व डॉ. नितीन पोवळे आदी उपस्थित होते.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply