महाड : प्रतिनिधी
बेकायदा सोने जवळ बाळगून वाहतूक करणार्या चिपळूण येथील चालकासह पाच जणांना महाड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 37 लाख 52 हजार रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे. चिपळूण येथून बेकायदा सोने जवळ बाळगून वाहतूक केली जाणार असल्याची खबर महाड तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर सोमवारी (दि. 24) गस्त घालून पहाटे 4 वाजता टोळ फाटा येथे नाकाबंदी केली. या दरम्यान झायलो गाडीतून प्रवास करणार्या चार जणांकडे 891.549 ग्रॅम सोने आढळून आले. बेकायदा सोन्याची वाहतूक करणार्या अशरफ फारूक शेख, समीर श्रीकांत भूनिया, गोपाळ बंकिम हजरा, राजकुमार सतीश मंडल आणि झायलो गाडीचा चालक हेमंत पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Check Also
खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …