Breaking News

सीकेटी महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले, तसेच या वेळी विविध स्पर्धांचे निकाल जाहीर झाले असून विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पुढाकाराने राष्ट्रीय मतदार दिवस कॉमर्स रिसोर्स सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मीम्स कॉम्पिटीशन, निबंध स्पर्धा, तसेच स्लोगन आणि पोस्टर या अ‍ॅनलाईन आणि ऑफलाईन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तसेच लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासंबंधित शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाला कोकण विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप, तहसीलदार विजय तळेकर, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, उपायुक्त विठ्ठल डाके, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सूर्यकांत परकाळ यांच्यासह सर्व स्वयंसेवक, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.

विजेत्या स्पर्धकांनी नावे : निबंध स्पर्धेत प्रथम अभिषेक पाटील, द्वितीय अनुष्का भोसले, तृतीय प्रिया चौधरी; मीम्स स्पर्धेत प्रथम जागृती सोनी, द्वितीय प्रणाम शेट्टी, तृतीय नेहा हेलगे; पोस्टर स्पर्धेत प्रथम ज्योती धायुडे, रोहित देशमुख, तृतीय ऋतुजा पाटील; स्लोगन स्पर्धेत प्रथम कीर्ती उलूडरोलू, द्वितीय गोकुळ पाल, तृतीय अरीफ साजीद.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply