Saturday , June 3 2023
Breaking News

पनवेल मनपातर्फे स्वातंत्र्यसैनिकांच्या उत्तराधिकार्यांचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त

शहरातील हुतात्मा स्मारक उद्यानात 73व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिकाच्या नातेवाईक सुनीता दत्तात्रेय गोखले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रायगड सुरक्षा रक्षक मंडळाच्या जवानांनी ध्वजाला मानवंदना दिली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने स्वातंत्र्य चळवळीतील समोर न आलेल्या योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्रसैनिकांच्या उत्तराधिकार्‍यांचा सन्मान सोहळा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरातील हुतात्मा स्मारक मैदानात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी स्वातंत्र्य चळवळीतील सुमारे 30 उत्तराधिकार्‍यांना ओळखपत्र, शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक माजी नगरसेवक अशोक खरे यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती वृषाली वाघमारे, आयुक्त गणेश देशमुख, तहसीलदार विजय तळेकर, नगरसेविका दर्शना भोईर, चारुशीला घरत, रुचिता लोंढे, उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, आयुक्त सुवर्णा दखणे आदी उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply