Breaking News

पेणच्या प्रश्नांसंदर्भात संयुक्त बैठक, आमदार रविशेठ पाटील यांनी केले मार्गदर्शन

पेण : प्रतिनिधी

निवडून आल्यानंतर आमदार रवीशेठ पाटील पेण तालुक्यातील प्रत्येक विभागातील समस्या जाणून घेत असून, शासकीय अधिकार्‍यांसोबत बैठका घेवून त्या नागरी समस्या मार्गी लावण्याचा धडाका त्यांनी सुरू केला आहे. त्यात प्रामुख्याने पाणी, खारलॅन्डचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी रविशेठ पाटील यांनी अग्रेसर भूमिका घेतली आहे.

पेण तालुक्यातील पाणीपुरवठा, खारभूमी, राष्ट्रीय महामार्ग या विषयासंदर्भात आमदार रविशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पेण प्रांत कार्यालयात संबंधीतांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीस नगराध्यक्षा प्रितम पाटील, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार अरुणा जाधव, जि. प. चे माजी विरोधी पक्ष नेते वैकुंठ पाटील, माजी सभापती संजय जांभळे, बाळाजीशेठ म्हात्रे, निवृत्त न्यायधीश डी. पी. म्हात्रे आदींसह पाणीपुरवठा, खारलँड, नॅशनल हायवे व संबंधित कार्यालयाचे प्रतिनिधी व पेण तालुक्यातील ग्रामस्थ

उपस्थित होते.

पेण खारेपाट विभागातील पाणी पुरवठा योजना कशाप्रकारे मार्गी लावण्यात येत आहे, याची माहिती यावेळी संबधित अधिकार्‍यांनी दिली. तर ही योजना लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येणार आहेत, या विषयी माहिती देवून आमदार पाटील यांनी, संबधित विभागातील ग्रामस्थांनी आपापले हेवेदावे विसरून पाणी शेवटच्या टोकापर्यंत कसे पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

खारेपाट विभागातील जनतेच्या समस्या सामंजस्याने सोडवून येथील शेतीची हानी कशाप्रकारे टाळता येईल याकडे अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, ज्या उपाययोजना केल्या आहेत त्या कुचकामी ठरत असून खाडी बांधण्यासाठी ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे, असे रवीशेठ पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे पेण तालुक्यातील, तसेच शहरातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत. वडखळ ते तरणखोप, खारपाडा या रस्त्यांवर अनेक अपघात झाले आहेत. तसेच वाशी, डोलवी या ठिकाणी ओव्हरब्रिजची व्यवस्था नसल्यामुळे येथील लोकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. पेण रेल्वे स्टेशन समोर बनविलेल्या अरुंद बायपासमुळे येथे मोठ्या गाड्यांना वळसा घेणे अवघड होता असून अपघात होण्याची दात शक्यता निर्माण झाली आहे. या अरुंद बायपासमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित ना झाल्यामुळे पावसाळ्यात पेण शहरातील पेट्रोल पंप, बाजार समिती, याठिकाणी पाणी जमा झाले होते. यामुळे संबधित अधिकार्‍यांनी कामात सुधारणा करावी, अशी मागणी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी या बैठकीत केली.

जनतेच्या नागरी समस्या लक्षात घेऊन अधिकार्‍यांनी त्या सोडवाव्यात,  अशा सूचना आमदार रविशेठ पाटील यांनी या बैठकीत दिल्या.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply