कर्जत : प्रतिनिधी
येथील रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक तीनवर पडलेल्या खड्ड्यामुळे प्रवाशांना अपघात होण्याची शक्यता होती. त्याकडे सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाने लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन फलाट क्रमांक तीनवरील खडे बुजविण्यात आले आहेत.
कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 3वर मुंबई ते खोपोली, कर्जत ते खोपोली तसेच काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांची नेहमी वर्दळ असते. या फलाटावर दोन-तीन मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे गाडी पकडताना किंवा फलाटावरून चालताना प्रवाशांना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने लगेचच या खड्ड्यांची दुरुस्ती केली. फलाट क्रमांक 3वरील खड्डे बुजविण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.