Saturday , June 3 2023
Breaking News

प्रा. एन. डी. पाटील यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल- लोकनेते रामशेठ ठाकूर

नवी मुंबई : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व माजी चेअरमन प्रा. एन. डी. पाटील सर आपल्या मनात कायमचे ठसलेले आहेत. त्यांचे काम पुढे नेण्यासाठी सतत जागृत राहूया हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले. ते नवी मुंबईत आयोजित आदरांजली कार्यक्रमात बोलत होते.
रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनानिमित्त आदरांजलीचा कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच (दि. 25) करण्यात आले होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दशरथशेठ भगत, अ‍ॅड. पी. सी. पाटील, मलकापूरच्या डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व अन्वय संस्थेचे संस्थापक डॉ. अजित मगदूम, प्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या प्रा. वृषाली मगदूम, तसेच नंदलाल आहेर, राजू (विक्रम) शिंदे, अजय वाळूंज, प्राचार्य डॉ. शुभदा नायक, उपप्राचार्य प्राध्यापक सी. डी. भोसले, ए. बी. वाघ, मनीषा काळे, पत्रकार महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, मॉडर्न स्कूलचे व्यवस्थापन समिती सदस्य तसेच विद्यालय व महाविद्यालयातील शिक्षकवृंद, कर्मचारी कोरोना नियमांचे पालन करून उपस्थित होते. मान्यवरांनी प्रा. ‘एनडीं’ना आदरांजली अर्पण केली.
आपले विचार व्यक्त करताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, एन. डी. सरांना दु:खी चेहरे केव्हाही आवडत नसे, कारण त्यांना वाटायचे की सर्वांनी आनंदात व सुखात राहिले पाहिजे. एन. डी. सर हे सर्वांचे होते. ते स्पष्टवक्ते होते आणि गोरगरीबांसाठी सतत झटत असत. एन.डी. सरांचा माझ्यावर खूप मोठा आधार व आशीर्वाद होता. अन्य मान्यवरांनीही मनोगत व्यक्त करून एन. डी. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply