Saturday , June 3 2023
Breaking News

पनवेल महापालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर – महापौर कविता चौतमोल

पनवेल : रामप्रहर वृत्त
नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पनवेल शहराबरोबरच महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासालाही गती मिळत असून महापालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे, असे प्रतिपादन महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात केले.
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज मैदानावर बुधवारी (दि. 26) महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी पुढे बोलताना डॉ. चौतमोल यांनी  कोरोना महामारीच्या संकटावर आपण यशस्वीपणे मात करीत आहोत. स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये आपल्याला मिळालेल्या यशामध्ये नागरिकांचा खूप मोठा वाटा आहे, असे सांगून याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले. आपण या वर्षी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असून आजपासून लोकशाही पंधरावडा साजरा करत आहोत. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदार नोंदणी करणे व मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
या सोहळ्याला उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती सभापती वृषाली वाघमारे, प्रमिला पाटील, नगरसेवक मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, समीर ठाकूर, मुकिद काझी, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, सुशीला घरत, राजेश्री वावेकर, आरती नवघरे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, भाजप कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, उपाध्यक्ष चिन्मय समेळ यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल, पालिकेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलन केले, तसेच ध्वजाला मानवंदना दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply