Breaking News

रेवस येथील समुद्रात मालवाहू बार्ज बुडाले

अलिबाग : प्रतिनिधी

रेवसनजीक कोळसा वाहून नेणारे मालवाहू बार्ज समुद्रातून बुडाल्याची घटना बुधवारी (दि. 3) सकाळी 9 वाजता घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बार्जमधील आठ जणांना सुखरूप धरमतर बंदरावर आणण्यात आले.

यारा शिपिंग कॉर्पोरेशन कंपनीचे ‘पृथ्वीराज’ बार्ज कोळसा नेण्यासाठी मुंबईहून धरमतर येथे येत होते. रेवस बंदराजवळ आल्यानंतर या बार्जला छिद्र पडले. या वेळी खलाशांनी आरडाओरडा केल्यानंतर दुसर्‍या बोटी धावून आल्या व त्यांनी या सर्वांना खुखरूप बाहेर काढले. त्यानंतर मेरीटाईम बोर्डाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. दुसर्‍या बोटीच्या सहाय्याने हे बुडालेले बार्ज किनार्‍यावर आणण्यात आले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply