Breaking News

रोहित, हे वागणं बरं नव्हं!

कोलकाता : वृत्तसंस्था

आंद्रे रसेल आणि हार्दिक पांड्या यांच्या तुफान आतषबाजीनं कोलकातातील इडन गार्डन दणाणून सोडलं. कोलकाता नाइट रायडर्सच्या 232 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून झुंज पाहायला मिळाली. मुंबईने लक्ष्याचा पाठलाग करताना 7 बाद 198 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात साजेशी झाली नाही. क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा हे दोन्ही सलामीवीर अवघ्या 21 धावांवर माघारी परतले. सुनील नरीनच्या सामन्याच्या दुसर्‍याच षटकात डी कॉकला झेलबाद केले. त्यानंतर चौथ्या षटकात हॅरी गर्नीने हिटमॅन रोहितला पायचीत केले. या निर्णयाविरोधात रोहितनं ऊठड घेतला आणि त्यातही त्याला बाद केले. त्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेनं जात असताना रोहितनं पंचांच्या जवळ पोहोचताच बॅट मुद्दाम स्टम्प्सना लावली आणि राग व्यक्त केला. रोहितच्या या कृतीवर टीका होत आहे.

दरम्यान, रोहितला सामन्यानंतर दंड भरावा लागला. आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या रोहितला सामन्यातील मानधनातील 15 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply