उरण : वार्ताहर
उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी (दि. 16) रायगड जिल्ह्यात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या चार तालुक्यांत राबविण्यात आली. उरण शहरात 13 ठिकाणी पल्स पोलिओ बुथवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत या केंद्रावर उरण येथे बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले. या मोहिमेत शून्य ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्यात आले.
उरण शहरातही 13 ठिकाणी पल्स पोलिओ बुथ ठेवण्यात आले असून एक मोबाईल बुथ ठेवण्यात आले आहे. उरण शहराचे उद्दिष्ट 3054 उदिष्टमधील आज रविवार (दि. 16) रोजी 2318 बालकांना डोस देण्यात आले. एकूण 75.90 टक्के बालकांना डोस देण्यात आले. डोस घेण्यात कोणतेही बाळ वंचित राहू नये याकरिता सोमवार (दि. 17) ते शुक्रवार (दि. 21) पर्यंत घरोघरी जाऊन बालकांना डोस देण्यात येतील, अशी माहिती इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांनी दिली. रायगड शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी उरण येथे येऊन पाहणी केली. उरण शहरात मोरा बंदर, दत्त मंदिर, उरण नगर परिषद शाळा क्र. 3, भवरा साल्ट ऑफिस, मांगीरदेव समाजमंदिर, बोरी पार, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, एन आय शाळा, सेंट मेरी कॉन्व्हेंट शाळा, कोकण ज्ञानपीठ कॉलेज, उरण बौद्यवाडा समाज मंदिर, कोटगाव मिठागर कार्यालय, उरण चारफाटा जकात चौकी, उरण बस डेपो आदी ठिकाणी बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे पल्स पोलिओ पर्यवेक्षक मोहन लक्ष्मण जगताप यांनी दिली.