Breaking News

चौकच्या नेताजी पालकर शाळेत हुतात्मा दिन

चौक : रामप्रहर वृत्त

विद्या प्रसारिणी सभा संचलित चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हुतात्मा दिन झाला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश देशमुख यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन केले, तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे उभे राहून आदरांजली वाहिली. या वेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभा देशमुख, सेक्रेटरी योगेन्द्र शहा, शाळेचे मुख्याध्यापक भोमले, प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सुलभा गायकवाड, उपमुख्याध्यापिका सौ. पुजारी, पर्यवेक्षक श्री. मुळीक तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, श्री व सौ. म्हात्रे यांनी संगीत स्वरात गीतगायन केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बडेकर यांनी केले. श्री. कुंभार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply