Breaking News

करंजाडेत हळदीकुंकू समारंभ

करंजाडे : रामप्रहर वृत्त

करंजाडे येथील सेक्टर 3मधील दुधे विटेवरी कॉम्पेक्समध्ये शनिवारी (दि. 29) हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा झाला. या वेळी सोसायटीमधील सर्वधर्मीय 60 महिलांनी मराठमोळी पारंपरिक वेषभूषेत सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात गणरायांचे स्तवन आणि गुरूवंदनेने झाली. मकरसंक्रांत कशी व का साजरा केली जाते, तिळाचे लाडू का खाल्ले जातात, तसेच काळी वस्त्रे का परिधान करतात, अशी महत्त्वाची माहिती एका आगळ्यावेगळ्या खेळासोबत देण्यात आली. कार्यक्रमात महिलांनी एकमेकींना हळदीकुंकू आणि वाण दिले व सोबत उखाणे घेतले. त्यानंतर सर्व महिलांनी मराठी, कोळी, हिंदी क्लासिकल, राजस्थानी व वेस्टर्न गाण्यावर जल्लोष केला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply