Breaking News

अजिवली विद्यालयातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार -चेअरमन राजेंद्र पाटील

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त
पुढील शैक्षणिक वर्षांपासून अजिवली येथील जनता विद्यालयातील 10 गरीब, गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेणार असून येथील विद्यार्थ्यांच्या पाण्याच्या सोयीसाठी दोन हजार लिटरची सिंटेक्स टाकी देणार असल्याची घोषणा जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन व भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी मंगळवारी (दि. 22) केली.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून अजिवली येथील जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफतवाटप करण्यात आले. त्या वेळी चेअरमन राजेंद्र पाटील बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले, गोविंद पाटील, नाना भागीत, कान्हा कडव, राम पाटील, प्राचार्य श्री. चवरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी बोलताना राजेंद्र पाटील यांनी, दरवर्षी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल व आजूबाजूच्या परिसरात एक लाखहून अधिक वह्यांचे मोफत वाटप केले असल्याचे सांगितले. त्याच अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण विद्यालयाला पाण्याची दोन हजार लिटर क्षमतेची टाकी देत असल्याचे सांगून पुढील शैक्षणिक वर्षांपासून या विद्यालयातील गरीब, गरजू 10 विद्यार्थ्यांना माझा मित्र कै. चेतन गोविंद जाधव याच्या स्मरणार्थ शिक्षण पूर्ण करण्यासाठी दत्तक घेणार असल्याचे जाहीर केले.
श्री ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळाने जनता विद्यालयाला एक लाख रुपयांचे, तर भाजपचे युवा नेते दशरथ म्हात्रे यांनी 65 हजार रुपयांचे बेंचेस दिल्याबद्दल राजेंद्र पाटील यांनी आभार व्यक्त केले आणि त्या अनुषंगाने त्यांना कृतज्ञता पत्र देण्यात यावे, असे मुख्याध्यापक चवरे यांना सांगितले, जेणेकरून यापुढेही जास्तीत जास्त दानशूर व्यक्ती पुढे येऊन विद्यालयाला मोठ्या प्रमाणात सहकार्य करतील, असेही अधोरेखित केले.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply