Breaking News

पिरकोनमधील स्मशान घाटाची डागडुजी

‘मैत्री कट्टा’तर्फे श्रमदान व स्वखर्चातून कार्य

उरण : बातमीदार

उरण तालुक्यातील पिरकोन गावातील फणसवाडी सेक्टर 11 येथील फणसवाडी मैत्री कट्टाच्या सर्व मित्र मंडळींच्या श्रमदानातून आणि स्वखर्चातून पिरकोन गावातील वैकुंठघाट (स्मशान घाट) डागडुजी करण्यात आली.

या घाटावरच्या चित्ता पेटवयाच्या पोलादी खांबांच्या खालच्या ढासळलेल्या अवस्थेतील पिलर्स आरसीसी काँक्रीटचे बांधकाम करून त्याची डागडुजी करण्यात आली, तसेच बसण्यासाठीच्या सभामंडपाला रंगरंगोटी करून बैकुंठधाम नावाचे फलक लावण्यात आले. यासोबतच स्मशानभूमीत प्रेताग्नीनंतर दहन होऊन अस्तिमिश्रित शिल्लक राहिलेली राख ही तशीच साचून राहिलेली असते आणि ती किमान चार छोटे टेम्पो भरून ती राख समुद्राच्या पाण्यात सोडून विसर्जित करण्यात आली. अस्थीघाट स्वच्छ करण्यात आला. सोबतच पिरकोन गावातील वैकुंठघाट  (स्मशानघाटाच्या) आजूबाजूचा संपूर्ण परिसर फणसवाडी सेक्टर 11 येथील फणसवाडी मैत्री कट्टाच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात आला.

वैकुंठ भूमीच्या डागडुजीच्या कामाचा आदर्श फणसवाडी मैत्री कट्टाच्या पदाधिकारी सदस्यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. या कार्यात सुरेश गावंड, रमाकांत जोशी, मंगेश म्हात्रे, हरिश्चंद्र गावंड, अनंता गावंड, काशिनाथ गावंड, सुनील घरत, अनिल घरत, राजेंद्र जोशी, प्रमोद जोशी, यातिश गावंड, प्रितम गावंड, प्रदीप गावंड, विलास पाटील, सुजित पाटील, समाधान पाटील, सागर पाटील, मयूर पाटील, केतन गावंड, सतिश म्हात्रे, प्रतिक घरत, निशाल गावंड, दिलेश गावंड, धनाजी पाटील, मनोहर गावंड, जयवंत गावंड, संतोष गावंड, संतोष जोशी, यज्ञेश गावंड, रुपेश पाटील, संतोष पाटील आदींनी सहभाग घेतला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply