Breaking News

उलवे येथे घरफोडी

पनवेल : रामप्रहर वृत्त
उलवा येथे राहणारे एक कुटुंब ऐन ईदच्या दिवशी घरी पाणी न आल्याने आपल्या नातेवाइकाकडे गेले होते. मात्र संध्याकाळी घरी येऊन पहिले असता चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतील एक लाख 33 हजाराचे दागिने चोरी केल्याचे समोर आले. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रहिमा बी अब्दुल रहीम लाब्बाय असे यातील फिर्यादीचे नाव आहे. पती दोन मुली सह त्या उलवा सेक्टर 19 येथे राहतात. 22 तारखेला घरी पाणी न आल्याने त्यांनी जवळच राहणार्या आपल्या बहिणीकडे ईद साजरी साजरी करण्यास गेल्या. दुपारी दोन वाजता गेल्यावर संध्याकाळी साडे सहा वाजता घरी आल्यावर दरवाजाला कुलूप नसून केवळ कडी लावलेली त्यांच्या निदर्शनास आले.
आत जाऊन पहिले असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले तसेच कपाटाचा दरवाजा उचकटून आतील दागिने चोरी झाल्याचे समोर आले. त्यात तीन झुमक्याचे जोड, एक नेकलेस, तीन सोन्याची नाणी, अंगठी व रोख पाच हजार असा एकूण एक लाख 33 हजाराचा ऐवज चोरी झाल्याचे समोर आले. सुरुवातीला या बाबत ऑन लाईन तक्रार देण्यात आली आणि दोन दिवसानंतर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष जाऊन दिलेल्या जबाबावर एनआरआय पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply