Saturday , June 3 2023
Breaking News

पनवेलमध्ये जलकुंभाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
अमृत अभियानांतर्गत पनवेल शहरातील मार्केट यार्ड परिसरात सात लाख दशलक्ष लिटर क्षमतेचे नवे जलकुंभ बांधण्यात आले आहे. या जलकुंभाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 2) उद्घाटन करण्यात आले.
पनवेल महापालिकेच्या हद्दीतील मार्केट यार्ड परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या सात लाख दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे व तीन लाख दशलक्ष लिटरच्या साठवण टाकीचा उद्घाटन सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या जलकुंभांमुळे मार्केट यार्ड परिसरातील पाण्याची समस्या कमी होणार असून मुबलक पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.
उद्घाटन समारंभास नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, महापालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी उदय सामंत, विश्वास चव्हाण, कल्पतरू सोसायटीचे चेअरमन प्रशांत ठाकूर, मनोज आंग्रे, रामदास तायडे, श्री. कर्डीले आदी उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पाण्याची समस्या कमी होण्यासाठी अमृत अभियानांतर्गत 29 गावांकरिता 43 पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत तसेच 12 साठवण टाक्याही बांधल्या जाणार आहेत. यातील पाच टाक्यांचे बांधकाम व तीन साठवण टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply