Breaking News

आपण भ्रष्टाचार रोखू शकतो -सुषमा सोनावणे

खालापूर : प्रतिनिधी

भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक कायदे आहेत. परंतु त्याबाबत असलेले आपले हक्क जाणून घेतले तर जनता नक्कीच लाच देण्याचा प्रस्ताव स्वीकारणार नाही, असा विश्वास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या पोलीस उपअधीक्षक सुषमा सोनावणे यांनी बुधवारी (दि. 27)खोपोली व्यक्त केला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त सहजसेवा फाउंडेशनच्या वतीने बुधवारी खोपोलीतील लोहाना सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुषमा सोनावणे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होत्या.

केंद्रीय लोकसेवेतील अधिकारी हे शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असल्यास त्यांच्यावर आम्ही  कारवाई करू शकतो, तर शासकीय अधिकारी ते लोकप्रतिनिधी यांनी शासकीय कामे करताना लाच घेतल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा सुषमा सोनावणे यांनी या वेळी दिला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडचे  पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी निरनिराळी उदाहरणे देत लाचलुचपत प्रतिबंधक कायदे व त्यांची अंमलबजावणी सोप्या भाषेतून समजून सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहजसेवा फाउंडेशनच्या उपाध्यक्षा इशिका शेलार यांनी केले.

फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, अखिलेश पाटील, वर्षा मोरे, संतोष गायकर, बी. निरंजन, जयश्री कुलकर्णी, सलमान शेख, आयुब खान, आशा देशमुख, विशाल शिर्के, मोहन केदार, आसिफ खान, आसमा पटेल, शीतल गायकवाड यांच्यासह खोपोलीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, पत्रकार, पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply