पनवेल : रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि.23) 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर 422 नवे पॉझिटीव्ह आढळले आहेत. दिवसभरात 266जण उपचारानंतर पूर्ण बरे झाले. आज पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात 171, पनवेल ग्रामीण 49, उरण 27, खालापूर 38, कर्जत 24, पेण 29, अलिबाग 49, मुरुड 11, माणगाव 9, रोहा 5, सुधागड 1, श्रीवर्धन 2 आणि महाडमधील 7 रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह संख्या 11,956 तर जिल्ह्यात एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 323 झाली आहे. आजवर 7 हजार 960 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
Check Also
रोटरी क्लबच्या पैठणी महोत्सवाचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने …
RamPrahar – The Panvel Daily Paper