Breaking News

ढाक भैरी डोंगरावर गिर्यारोहकाचा मृत्यू

खोपोली, कर्जत : बातमीदार

कर्जत व मावळ तालुक्यातील लोणावळा नजीक असलेल्या ढाक बहिरी या डोंगरावर औरंगाबादच्या गिर्यारोहकाचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 5) घडली.

औरंगाबादचे प्रतीक आवळे, पंकज गावडे, सुजित लहाने, अभिषेक शेजुळ व सागर जयस्वाल हे पाच जण गिर्यारोहणासाठी ढाक भैरी या डोंगरावर आले होते. गिर्यारोहण करीत असताना, प्रतीक आवळे यांचा तोल जाऊन तो खाली पडला व गंभीर  दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेचे वृत्त समजताच तुषार महाडिक व भारत रायकर यांनी इतर ट्रेकर्सना सुरक्षित बाजूला नेले. याच दरम्यान मदतीचा कॉल येताच खोपोलीतील यशवंती हायकरचे सर्व जवान, कर्जतमधील संतोष दगडे व त्यांची टीम त्याप्रमाणे सांडशी ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले.

दरम्यान, प्रतीक व त्यांच्या सहकारी गिर्यारोहकांना डोंगराच्या पायथ्याशी सांडशी गावाच्या दिशेने आणण्यास प्रारंभ झाला. उतार तसेच डोंगरउतार कड्याची अरुंद जागा, या प्राप्त परिस्थितीत दरमजल करीत काळोखी रात्री सर्व जण पहाटे तीनच्या दरम्यान सांडशी गावात पोहचले. त्यानंतर त्यांना कर्जतला आणण्यात आले.  या सर्व मदतटीममध्ये यशवंती हायकरचे पद्माकर गायकवाड, महेंद्र भंडारे, अरविंद पाटील, अभिजित घरत, सौरभ रावळ, भावेश शिर्के, राजू मोरे, रुपेश जाधव, प्रणित गावंड, संदीप पाटील तसेच कर्जतचे संतोष दगडे व त्यांची टीम त्याप्रमाणे सांडशी गावातील ऋषिकेश कदम, किरण शिर्के, संकेत कदम, संदेश शिर्के, मंगेश तुरडे, रोशन पेडणेकर, हरी ठोंबरे, लखन जाधव, गणेश मुकणे, व गणेश सोमनाथ आदींचा समावेश होता.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply