Breaking News

कर्जतमध्ये बर्निंग कार

कर्जत : प्रतिनिधी

कल्याण येथून लोणावळा येथे निघालेली फोर्ड कंपनीची डटसन गाडी कर्जत येथील चार फाटा येथे जळून खाक झाली आहे.

कल्याण येथील चिकन घर येथे राहणारे किरण मोतीराम भोईर हे फोर्ड कंपनीच्या डटसन गाडी (एमएच 04 जीजे 9733) घेऊन आपल्या शेजारी राहणारे रजनीश चौबे यांना लोणावळा येथे डायलिसिससाठी घेऊन चालले होते. कर्जत चारफाटा येथे आल्यावर गाडीच्या बोनेट मधुन धूर येऊ लागला त्यानंतर गाडीने अधिक पेट घेतला.

परिसरातील काही व्यापार्‍यांनी आग विझण्यासाठी प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत गाडीने अधिक पेट घेतला होता. कर्जत नगरपरिषदेच्या अग्निशमन गाडीला पाचारण करण्यात आले, मात्र तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती. दरम्यान, चार फाट्यावर झालेली वाहतूक कोंडी कर्जत पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी पूर्वपदावर आणली.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply