Breaking News

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मोफत मिल्कशेक; नेरळ तंटामुक्ती आणि संघर्ष समितीचा अनोखां उपक्रम

कर्जत : बातमीदार

भरगोस मतदान होण्यासाठी उन्हातून येणार्‍या मतदारांना नेरळ तंटामुक्ती समिती आणि संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी मोफत मिल्कशेक आणि थंड पाण्याचे वाटप करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाने मतदारांना दिलासा मिळाला.

मावळ लोकसभा मतदार संघात सोमवारी मतदान झाले. भर उन्हात अनेक मतदारांनी मतदान केले. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. नेरळमधील रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेतील मतदान केंद्राजवळ तंटामुक्ती समिती आणि संघर्ष समितीने अनोखा उपक्रम राबविला. त्यांनी मतदान करण्यासाठी येणार्‍या सर्वच मतदारांना मोफत मिल्कशेक आणि थंड पाण्याचे वाटप केले. यासाठी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष मोरे, संघर्ष समितीचे नारायण सुर्वे, अखिल मुल्ला आदींनी मेहनत घेतली.

तसेच कर्जतमधील कोकणी खानावळमध्ये जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना 50 टक्के सूट देण्यात आली होती. येथेही अनेक मतदारांनी या संघीचा फायदा घेतला. यावेळी शेकडो मतदारांनी जेवणाचा आस्वाद घेतला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply