कर्जत : बातमीदार
महिला मतदारांबद्दल स्नेहभाव दाखविण्यासाठी निवडणूक आयोगाने कर्जतमध्ये महिला अधिकारी व कर्मचारी असलेले सखी मतदार केंद्र उभारले होते. तसेच पाळणाघरांमुळे महिला मतदार आज आनंदाने मतदान करून जात होते.
निवडणुक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी कर्जतमधील अभिनव प्रशालेत सखी मतदान केंद्र निर्माण केले होते. या सखी केंद्रात महिला अधिकारी व कर्मचारी कार्यरत होत्या. यावेळी मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून अश्विनी अशोक सपकळ तर प्रथम केंद्र अधिकारी म्हणून ए. पी. गायकवाड, द्वितीय केंद्र अधिकारी म्हणून मनीषा बबन खाडे, द्वितीय केंद्र अधिकारी म्हणून सी. ए. शिंगाडे, सु. वि. धर्माधिकारी यांनी तर शिपाई म्हणून ए. डी. पवार आणि पोलीस गार्ड राधिका वारगुडे यांनी काम पाहिले. मतदारांना मदत करण्यासाठी स्वयंसेविका म्हणून गाईड विद्यार्थिनी साक्षी महेंद्र कदम हिने कामकाजात मदत केली. मतदारांसाठी निवडणूक आयोगाकडून येथे सेल्फी पॉईंट बनविण्यात आला होता. या केंद्राचे प्रवेशद्वार फुलांनी आणि रंगीबेरंगी फुग्यांनी सजविण्यात आले होते. कर्जत विधानसभा मतदारसंघात असलेल्या 343 मतदान केंद्रावर मतदारांच्या लहान बाळांसाठी पाळणाघर बनविण्यात आली होती. त्या पाळणा घरात त्या ठिकाणच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी खेळणी घेऊन मतदान करण्यासाठी येणार्या मतदारांच्या बालकांना खेळविण्याचे काम केले.
