Breaking News

नगराध्यक्ष निवडणुकीत भाजप विजयी

लातूर जिल्ह्यातील चाकूर नगरपंचायतीत कमळ फुलले; उपनगराध्यक्षपदावरही वर्चस्व

लातूर : प्रतिनिधी

भाजपच्या कार्यकर्त्यांनी लातूर जिल्ह्यात चाकूर नगरपंचायतीत पक्षाचे बहुमत नसतानाही स्थानिक राजकीय समीकरणे जुळवून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीत बाजी मारली आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला रोखले तसेच शिरूर अनंतपाळ येथे भाजपचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडून आले. त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन पक्षांना मिळून आठ जागा मिळाल्या आहेत तर भाजपाला तीन जागा मिळाल्या आहेत. तथापि, भाजपने स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे जुळवून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळविण्यापासून रोखले. या नगरपंचायतीत बुधवारी (दि. 9) नगराध्यक्षपदी अपक्ष नगरसेवक कपिल माकने निवडून आले तर उपनगराध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक अरविंद बिराजदार यांची निवड झाली. नगरपंचायत निवडणुकीत जेथे भाजपला बहुमत मिळाले नाही तेथेही पक्ष राजकीयदृष्ट्या महाविकास आघाडीवर मात करेल, असा इशारा  चंद्रकांत पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दिला होता. त्यानुसार पक्ष कार्यकर्त्यांनी चाकूरमध्ये यश मिळविले.

लातूर जिल्ह्यातच शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीत भाजपने नऊ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले होते. तेथे मंगळवारी नगराध्यक्षपदी भाजपच्या नगरसेविका माया धुमाळे यांची निवड झाली. उपनगराध्यक्षपदी भाजपच्याच नगरसेविका सुषमा मठपती यांची निवड झाली.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चाकूर व शिरूर अनंतपाळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचे तसेच या यशाबद्दल माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह सर्व नेते कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. राज्यात नुकत्याच झालेल्या 105 नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकून पहिला क्रमांक मिळविला आहे तसेच स्पष्ट बहुमत मिळालेल्या नगरपंचायतींच्या बाबतीतही भाजप पहिल्या क्रमांकावर आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply