Breaking News

संजय राऊत यांनी एवढी बोंबाबोंब करायची गरज काय?

भाजप नेते किरीट सोमय्यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात भाजपवर गंभीर आरोप केले आहेत तसेच केंद्रातील सत्ताधार्‍यांकडून सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) गैरवापर करीत विरोधकांचा छळ केला जात असल्याचा आरोप केला आहे. त्यास भाजपकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला असून भ्रष्टाचार, घोटाळे, गैरव्यवहार करणार्‍यांचे कर्दनकाळ भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राऊतांवर आपल्या खास शैलीत निशाणा साधला आहे.
संजय राऊतसाहेबांचा नर्व्हसनेस, (उपराष्ट्रपतींना) पाच पानांचे पत्र, अधिकार्‍यांना धमक्या हे समजू शकतो. राऊतसाहेबांचे एक पार्टनर प्रवीण राऊत एक हजार 37 कोटींच्या पीएमसी बँक घोटाळ्यात जेलमध्ये आहेत. राऊत परिवाराचे दुसरे व्यावसायिक भागीदार सुजीत पारकर यांची 100 कोटींच्या कोविड घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. यांच्या लाभार्थ्यांची ईडी किंवा सीबीआय चौकशी करीत असतील, तर राऊतांनी एवढी बोंबाबोंब करायची काय गरज आहे, असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.
संजय राऊतसाहेब, तुमची पत्नी, तुमच्या मुली या प्रवीण राऊत, सुजीत पारकरच्या कंपनीत पार्टनर आहेत. हिशोब तर द्यावा लागेल. धमक्या देऊन चौकशी संपणार नाहीये. अनिल देशमुख जेलमध्ये आहेत, अनिल परब वाट पाहात आहेत. एक राऊत जेलमध्ये आहेत, दुसरे राऊत लाभार्थी सापडल्यावर शिक्षा तर होणारच, असेही सोमय्यांनी म्हटले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply