पनवेल : प्रतिनिधी
महापौर कविता चौतमोल यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियानांतर्गत टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत एकदिवसीय प्रदर्शन गुरुवारी (दि. 10) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर डॉ. कविता किशोर चौतमेाल यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनामुळे टाकाऊ कचर्यापासूनसुध्दा टिकाऊ वस्तूंची निर्मिती होऊ शकते याचा उत्तम संदेश पालिका क्षेत्रातील नागरिकांना मिळणार आहे तसेच सुक्या कचर्याची स्थानिक पातळीवर विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे हे या प्रदर्शनातून नागरिकांना समजू शकणार आहे.
पनवेल महापालिकेने आयोजित केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंच्या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी चार सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे. या स्पर्धेत यशस्वी होणार्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.