नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
वाशीच्या खाडीमध्ये शुक्रवारी (दि. 11) डॉल्फिन मासा पहायला मिळाला. मासेमारी करणार्या युवकाने पाण्यामधून बाहेर उडी मारणार्या डॉल्फिन माशाचे दृश्य आपल्या मोबाइलमध्ये कैद केले आहे.
मागील वर्षीदेखील नवी मुंबईत डॉल्फिन पाहायला मिळाला होता. नवा व्हिडीओ व्हायरल झाला असून आता नवी मुंबईकर डॉल्फिनला पाहण्यासाठी खाडीकिनारी गर्दी करताना दिसत आहेत.
डॉल्फिन ही सस्तन माशाची प्रजाती असून त्याला जलचरांतील बुद्धिमान प्राण्यांपैकी एक मानले जाते. डॉल्फिन हे साधारणपणे खोल समुद्रात असतात.
Check Also
शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा
महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …