लखनऊ : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुसर्या फेरीच्या मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि. 11) कासगंज येथे प्रचारासाठी आले होते. या वेळी त्यांनी पहिल्या टप्प्यात भाजपला प्रचंड बहुमत मिळेल, असा दावा केला तसेच जनता तुम्हाला स्वीकारणार नाही, जनतेला गुंडराज नको आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना टोला लगावला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काल यूपीत पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. लोकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून यूपीच्या विकासासाठी कमळाला मतदान दिले. विशेष म्हणजे आमच्या बहिणी आणि मुलींनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. सध्याच्या कलानुसार पहिल्या टप्प्यात भाजपचा झेंडा फडकताना दिसतोय. काल दुपारनंतर सर्व नेत्यांच्या मुलाखती आल्या आहेत. त्यात विरोधी नेत्यांचे चेहरे पडलेले पहायला मिळाले.
उत्तर प्रदेशात विरोधकांनी ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाला टार्गेट केले आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिले असेल, एखाद्या वेळी गोलंदाजाला विकेट मिळत नसेल तर तो पंचांवर चिडत असतो तसेच काहीसे या निवडणुकीत पहायला मिळत आहे. समोर हार दिसत असताना विरोधी पक्षांनी इव्हीएमकडे बोट दाखवायला सुरुवात केलीय, पण काही झाले तरी भाजपचा विजय निश्चित आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …