Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवर वेबीनार

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील रसायन शास्त्र विभागातर्फे शनिवारी (दि. 12) रोजी राष्ट्रीय पातळीवर एकदिवसीय नॅनोसायन्स आणि त्याचे उपयोग या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

हा कार्यक्रम मायकोसॉफ्ट टिम्स या ऑनलाइन माध्यमाने सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये भारतातील तसेच साऊथ अफ्रिकेतील वक्ते सामील झाले. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. शशांक म्हस्के (आयसीटी, मुंबई) यांनी नॅनोपार्टिकल विविध पॉलिमर आणि रेसिनचे संश्लेषण आणि वैशिष्टयीकरण नॅनो सेल्युलोज फायबर यांचा वापर या विषयावर तर डॉ. संदेश जयभये (बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण) यांनी ग्रीन सिंथेसिस ऑफ नॅनो पार्टिकल्स, प्रो. जयश्री रामकुमार (बीएआरसी, मुंबई) यांनी नॅनोकणांचे पर्यावरणीय उपायेग, डॉ. अनिरुद्व चॅटर्जी (एमआयटी, औरंगाबाद) यांनी नॅनो हायब्रीड नॅनोकंपोसिटस, प्रो. हिमांशु नारायण (नॅशनल युनिवर्सिटी ऑफ लेसोथो, साऊथआफ्रिका) यांनी फोटो कॅटालिसिस प्रक्रियेतील नॅनो तंत्रज्ञानाचा अंतर्भाव नमूद केला.

प्राचार्य डॉ. संजय मराठे यांनी पाहुण्यांचे स्वागत, रसायनशास्त्र प्रमुख आयक्युएसी प्रा. महेश्वरी झिरपे यांनी प्रस्तावना केली. वनस्पती शास्त्र विभागाच्या प्रा. नमिता सिन्हा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी राष्ट्रीय पातळीवर व्याख्यान आयोजित केल्याबद्दल आयोजकांची प्रशंसा केली तसेच संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिध्देश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नावेखाडीत शिवमंदिर जीर्णोद्धार सोहळा आणि श्रींची पुनःप्रतिष्ठापना

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील नावेखाडी मधलापाडा येथे शिवमंदिर जीर्णोद्धार आणि श्रींची पुनःप्रतिष्ठापना सोहळा माजी …

Leave a Reply