Breaking News

उरणमध्ये वॉटर प्युरिफाय बॅगचे वाटप

उरण : वार्ताहर

सारडे विकास मंच, साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोप्रोली, सुयश क्लासेस आवरे यांच्या संयुक्त विद्यमाने फोर लाईफ कंपनीतर्फे मोफत सावा वॉटर प्युरिफाय बॅगचे वाटप करण्यात आले.

सावा वॉटर प्युरीफाय बॅग ही सूर्याच्या किरणावर म्हणजे सौर ऊर्जे वर चालणारी आहे. याची क्षमता चार लिटर एवढी आहे. प्रथमच उरणमध्ये सारडे, कोप्रोली, पाले, आवरे, वशेणी आसे 100 नागरिकांनी या बॅगसाठी फॉर्म भरला होता, त्यांना ह्या बॅगचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात फोर लाईफ कंपनीचे मुख्य शमीदर कोचर, संतोष खंडागळे, जयश्री खंडागळे, निर्भय म्हात्रे, उद्योगपती अजित पाटील, शशिकांत पाटील, प्रसाद पाटील, दिनेश गाताडी, पत्रकार सुभाष कडू, पंकज ठाकूर, विवेकानंद म्हात्रे, अशोक पाटील, लता राजपूत, सुयश क्लासेस आवरेचे निवास गावंड, साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे राकेश पाटील, प्रशांत म्हात्रे, नरेश गावंड, सुफळ आहारचे शिवकुमार म्हात्रे, त्रिजन म्हात्रे, स्वाती पाटील, वशेणी ग्रामपंचायत सदस्य शोभा पाटील, प्रथम शिक्षण संस्थेचे रणिता, हेमाली, सुरज ठाकूर, सारडे विकास मंचचे सह सचिव मंगेश पाटील, त्रिजन पाटील, सीएचए संघटनेचे हरिष म्हात्रे, अल्पेश जोशी, दूषण ठाकूर, समालोचक प्रवीण ठाकूर आदी उपस्थित होते.

निवास गावंड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तर निर्भय म्हात्रे, हेमाली, शशिकांत पाटील यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. फोर लाईफच्या शमीदर खोचर यांनी ही बॅग कशी वापरावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवून बॅगचे फायदे आणि त्याची सविस्तर माहीती दिली. उपस्थिती नागरिकांना अनेक प्रश्न विचारून आपल्या शंकेचे निरसन केले. शेवटी साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे राकेश यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply