पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील रोहिदास वाड्यात महापालिकेमार्फत समाज मंदिर उभारण्यात येत आहे. या समाज मंदिराच्या कामाची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्यांसह पाहणी करून त्यांना आवश्यकत्या सूचना दिल्या.
या पाहणीदरम्यान नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, माजी नगरसेवक अरविंद सावळेकर, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर, प्रवीण मोहोकर, बाब्या जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
पनवेल महापालिकेमार्फत विविध नागरी सुविधा व सेवा उपलब्ध करून देण्याचे काम महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्या अनुषंगाने रोहिदास वाड्यातील समाज मंदिर कामाची पाहणी करण्यात आली.