नगरसेवक विक्रांत पाटील यांची तत्परता
पनवेल : वार्ताहर
पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 18 येथील धोकादायक गटारांवरील झाकणे नव्याने बसविण्यात आली आहेत. या कामी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाठपुरावा केला.
प्रभाग 18मधील यशश्री सोसायटी समोरील गटारावरील स्लीपर्स कुचकामी आणि तुटली होती. रहदारी रस्ता असल्याने ज्येष्ठ नागरिक लहान मुले आणि नागरिकांची नेहमीच वर्दळ या रस्त्यावर असते. काही झाकणे तुटल्यामुळे दुर्घटना होऊन शारीरिक इजा होण्याची संभावना होती. ही बाब काही जागरूक नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. विक्रांत पाटील यांनी तातडीने पावले उचलत महानगरपालिका अधिकार्यांशी बोलून गटारावरील सर्व झाकणे बदलून घेतले. नगरसेवक विक्रांत पाटील समस्या छोटी असो किंवा मोठी तिचे निरसन त्वरित करतात याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.