Breaking News

खोपोलीत अफवांचा पूर; सुरक्षा यंत्रणांची धावपळ

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असताना अफवांचादेखील पूर आला असून त्यामुळे आपत्कालीन यंत्रणांची बुधवारी (दि. 13) चांगलीच धावपळ झाली.

खोपोली शहराच्या रहाटवाडा या परिसरात असणार्‍या पुलावरून दोन मुले वाहून गेल्याची वार्ता शहरात वार्‍यासारखी पसरली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, अमोल कदम, सुनील पुरी, योगेश औटी, भक्ती साठेलकर तातडीने तेथे पोहचले. खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हरीश काळसेकर, खोपोली अग्नीशमन दलाचे अधिकारी हरी सूर्यवंशी हेदेखील दाखल झाले.

खोपोली पोलीस ठाण्याचे, महसूल विभागाचे व खोपोली नगरपालिकेचे कर्मचारी इत्यादींनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांसोबत संपूर्ण परिसर पिंजून काढला.  हनिफ कर्जीकर, अमोल ठकेकर, दिनेश ओसवाल, धवल भानुशाली, राजेश पारठे, अमित गुजरे यांनी जागोजागी नदीच्या प्रवाहावर लक्ष ठेवले. तहसीलदार आयुब तांबोळी यांनी सर्व अधिकार्‍यांसोबत चर्चा करुन सुरक्षा यंत्रणेच्या कर्मचार्‍यांना सतर्क रहण्याचे निर्देश दिले आणि नागरिकांना अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहावे असे आवाहन केले आहे.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply