Breaking News

पेण तालुका क्रीडा संकुल अद्ययावत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार; आमदार रविशेठ पाटील यांची ग्वाही

पेण ः प्रतिनिधी

पेण तालुका क्रीडा संकुल अद्ययावत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आमदार रविशेठ पाटील यांनी दिली आहे. शहरातील तालुका क्रीडा संकुलात झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी आले असता ते बोलत होते. आमदार रविशेठ पाटील यांच्यासमवेत नगराध्यक्ष प्रितम पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडू, भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, बांधकाम सभापती दर्शन बाफना, माजी नगराध्यक्ष रघुनाथ बोरेकर, भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्ष सुप्रिया चव्हाण, क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, नगरसेवक अजय क्षीरसागर, माजी सभापती सुधीर जोशी, युवा नेते ललित पाटील आदींसह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. पेण तालुका क्रीडा संकुलात उभारण्यात आलेले सौरऊर्जेवरील हायमास्ट दिवे, बॅडमिंटन सिथेंटीक मॅट आदी विकासकामांची पाहणी आमदार रविशेठ पाटील यांनी केली. या वेळी बोलताना त्यांनी मंत्रिपदाच्या कारकिर्दीत तत्कालीन मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडून क्रीडा भवन मंजूर करून घेतले. शहरातील तसेच तालुक्यातील क्रीडाप्रेमींसाठी हे संकुल वरदान ठरत असून येथूनच एखादा जागतिक क्रीडापटू निर्माण होईल, अशी अशा व्यक्त करीत या क्रीडा संकुलाच्या सोयी सुविधांसाठी शासनाचा विविध विकास निधी, आमदार निधीतून भरीव मदत करेन, असे अभिवचन त्यांनी दिले. नगराध्यक्ष प्रितम पाटील यांनी सांगितले की, गेल्या 10 वर्षांत आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वखाली पेण नगर परिषदेच्या माध्यमातून विकासकामे करण्यात आली असून यापुढेही  कामे होत राहतील. नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास आम्ही कटिबद्ध असून गेल्या 10 वर्षांत जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखविला आहे तो यापुढेही कायम राहणार आहे हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. निवडणुका आल्यावर अनेकांच्या फेर्‍या पेणमध्ये वाढतात, परंतु पेणचा विकास करण्यात आमदार रविशेठ पाटील यांचेे नेतृत्व सक्षम असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यापुढेही जनतेची सेवा कारण्याचे काम करणार आहोत.  क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांनी आमदार रविशेठ पाटील यांनी क्रीडा संकुलाच्या विविध कामांमध्ये वेळावेळी मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

Check Also

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन

विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …

Leave a Reply